2.0 सिनेमाचा नवा विक्रम, रिलीजपूर्वीच जोरदार कमाई

2.0 सिनेमाचा नवा विक्रम, रिलीजपूर्वीच जोरदार कमाई

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत हे एकाच चित्रपटात येणार हे ऐकताच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. ‘2.0’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘2.0’ या सिनेमाने रीलिजपूर्वीच कमाईचा नवा विक्रम नोंदविला आहे. या सिनेमाने इतकी कमाई केली आहे की, तो रीलिज झाल्यानंतर प्रेक्षकांना जरी पसंत पडला नाही तरी निर्मात्यांना कोणतेही नुकसान होणार नाही.

तसेच नुकताच या सिनेमाचं ‘तु ही रे’ हे 20 कोटींचं गाणं रिलीज झालं या गाण्याल्याही प्रेक्षकांचा भरघोष प्रतिसाद मिळाला.

‘2.0’ हा बिग बजेट असलेला आणखी भारतीय सिनेमा आहे. या सिनेमाला 400 ते 500 कोटी रुपयांचा खर्च आल्याचे बोलले जात होते. मात्र, ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात रजनीकांत यांनी या सिनेमाचे बजेट एकूण 550 ते 600 कोटी असल्याचे सांगितले. तरीही सुमारे 543 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 490 कोटींची कमाई केल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तमिळ भाषेत या चित्रपटाचे 120 कोटींचे बुकिंग झाल्याचे म्हटले जात आहे.

‘2.0’ या खिलाडी-सुपरस्टारच्या या चित्रपटाने सॅटेलाईट राईटस्, डिजिटल राईटस् आणि डिस्ट्रिब्यूशन राईटस्मधून 370 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतील डिजिटल राईटस् 60 कोटींना विकले गेले आहेत. तर लाईका प्रॉडक्शनने या चित्रपटाचे सॅटेलाईट राईटस् 120 कोटींना विकले आहे. अशा पद्धतीने या चित्रपटाने रीलिज होण्यापूर्वीच सुमारे 490 कोटी रुपयांची दमदार कमाई केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version