बजाज पल्सरचे 160CC चे नवीन दमदार मॉडेल लाँच

बजाज पल्सरचे 160CC चे नवीन दमदार मॉडेल लाँच

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बाजारात लाँच होणाऱ्या वेगवेगळ्या बाईक्सची तरुणांना नेहमीच प्रतिक्षा असते.  त्यातही तरुणांना सर्वाधिक आकर्षण असते  ते रेसिंग आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक्सचे.

 

तरुणांची आवड लक्षात घेवून बजाज ऑटोने आपली नविन पल्सर बाईक भारतीय बाजारपठेत लाँच केली आहे.

 

“पल्सर NS 160” असं या नव्या बाईकचे नाव आहे. 160CC  इंजीन क्षमतेची ही बाईक आहे. ही बाईक सर्वोत्तम क्वॉलिटी, इंटरनॅशनल स्टाइल आणि दमदार परफॉमन्स देणार असल्याचा  दावा बजाज कंपनीने केला आहे.

 

या बाईकची किंमत 80,648 इतकी आहे. ही बाईक बजाज पल्सर 200 मॉडेलची कॉपी आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version