Kirit Somaiya On Lonavala Crime : घाटकोपरच्या 16 वर्षीय तरुणीवर लोणावळ्याला नेऊन अत्याचार; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, "8 मुस्लिम ‘गुंड’…"

घाटकोपरच्या असल्फा विभागातून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला लोणावळा येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kirit Somaiya On Lonavala Crime : घाटकोपरच्या 16 वर्षीय तरुणीवर लोणावळ्याला नेऊन अत्याचार; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, &quot8 मुस्लिम ‘गुंड’…"

घाटकोपरच्या असल्फा विभागातून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला लोणावळा येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी निहाल अन्सारी आणि मोहम्मद अशफाक शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खळबळजनक दावा करत गंभीर आरोप केले आहेत.  हा गँग रेप असण्याचा संशय व्यक्त करत कठोर चौकशीची मागणी केली आहे. घाटकोपरमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने हा घाटकोपर जिहाद असल्याचा आरोप करीत त्यावर कडक कारवाईची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

हेही वाचा- Navi Mumbai Crime News : इंजेक्शन दिलं आणि तिची प्रकृती बिघडली; पालिका रुग्णालयात गरोदर महिलेनं जीव गमावल्यानंतर कुटुंबियांचा गंभीर आरोप

यावेळी त्यांनी ट्वीट करत माहिती दिली की, “घाटकोपर जिहादचे 8 मुस्लिम “गुंड” 16/17 वर्षांच्या हिंदू तरुणींना जाळ्यात अडकवताना आढळले. ते त्यांचे अपहरण करून त्यांना लोणावळ्यातील एका “व्हिला” मध्ये घेऊन जातात आणि शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात. घाटकोपर पश्चिम मुंबई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद (वय 22), निहाल (वय 22), फातिमा… यांची चौकशी सुरू आहे. गेल्या 4 महिन्यांत घाटकोपर जिहादची अशी 3 प्रकरणे उघडकीस आली आहेत.” दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची गरज किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version