पाणी पुरी हवरट, …म्हणून ‘तो’ करायचा सायकल चोरी

पाणी पुरी हवरट, …म्हणून ‘तो’ करायचा सायकल चोरी

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

गेल्या दोन महिन्यांपासून अकोट शहरातील ट्युशन क्लासेस आणि शाळा-महाविद्यालय परिसरातून सायकल चोरीचं प्रमाण वाढले. यावेळी पोलीसांनी पाळत ठेवून चोराला धडा शिकवण्याचे ठरवले. अखेर पोलिसांनी सापळा रचून या चोराला ताब्यात घेतले आहे. जेव्हा पोलिसांनी या चोराला पकडले त्यावेळी पोलिसही चक्रवून गेलेत.

हा सायकल चोर दुसरा तिसरा कोणी नसून चक्क दहावीतला अवघ्या पंधरा वर्षांचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या आठ सायकल जप्त करण्यात आल्यात. गंमत तर पुढे आहे. चोरीचं कारण ऐकून तर पोलीस आश्चर्यचकीतच झाले.

सायकल चोरीतून येणारे पैसे हा विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा इतर खर्चासाठी वापरत नसून पाणीपुरी खाण्यासाठी वापरायचा. होय पोलीस तपासणीत या विद्यार्थ्याने हे कबूल केले आहे. हे ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्काच बसला. तो सायकल विकून आलेल्या पैशांतून पाणीपुरी खायचा आणि पाणीपुरी आपल्या मित्रांनाही खावू घालायचा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version