जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर
विदर्भात विविध जंगलांमध्ये गेल्या आठ महिन्यात 15 वाघांचा मृत्यू धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिलीय. तारांकित प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे ही माहिती दिलीय.
एकीकड़े वाघाच्या संरक्षणाकरीता करोड़ो रुपये खर्च होत आहेत. मात्र, दूसरीकड़े वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
विदर्भाच्या अनेक भागातील जंगलात जानेवारी 2017 ते ऑगस्ट 2017 या आठ महिन्यात 15 वाघांचा मृत्यू झाल्याची धकादायक माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.