पंतप्रधानांनी केला ‘भानुमती’च्या म्हणीचा उच्चार! काय आहे नेमकी कहाणी?

पंतप्रधानांनी केला ‘भानुमती’च्या म्हणीचा उच्चार! काय आहे नेमकी कहाणी?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना काँग्रेस पक्षासाठी एक अतिशय जुनी आणि प्रसिद्ध म्हण म्हटली. “कहीं की ईंट, कहीं का रोड़ा, भानुमतिने कुनबा जोड़ा” ही म्हण ऐकल्यानंतर मनात एकच प्रश्न येतो की ही भानुमती कोण आहे? जिच्या नावाने ही म्हण तयार झाली. भानुमती काल्पनिक महिला नसून ती महाभारतातील शूर योद्धा दुर्योधनाची पत्नी होती. पौराणिक कथांनुसार, महाभारताच्या युद्धात दुर्योधन मारला गेल्यानंतर भानुमतीने पाच पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनाशी विवाह केला होता.

काय आहे नेमकी कहाणी?

पौराणिक कथेनुसार, भानुमती ही कंबोज राजा चंद्र वर्मा यांची कन्या होती. ती अतिशय सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती. भानुमतीच्या स्वयंवरादरम्यान दुर्योधनाने आपल्या मित्र कर्णाच्या मदतीने भानुमतीला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने हार घालून तिच्याशी लग्न केले होते, असे कथांमध्ये सांगितले आहे. महाभारताचे युद्ध निश्चित झाल्यावर चतुर भानुमतीला कळले की कौरवांचा नाश निश्चित आहे, म्हणून आपली ओळख आणि कुटुंब वाचवण्यासाठी भानुमतीने आपली मुलगी लक्ष्मणा हिला कृष्णाचा मुलगा सांबासोबत विवाह करायला सांगितला. या विवाहासाठी मुलीला पळून जाण्यास सांगितले. अशाप्रकारे भानुमती आपल्या मुलीचा विवाह सांबा याच्यासोबत करण्यास यशस्वी झाली. तर, युद्धात दुर्योधन मारला गेल्यानंतर भानुमतीने अर्जुनाशी विवाह केला. तेव्हापासून “कहीं की ईंट, कहीं का रोड़ा, भानुमतिने कुनबा जोड़ा” ही म्हण प्रचलित झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version