निर्मला सीतारामन करणार विक्रम

निर्मला सीतारामन करणार विक्रम

नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरुवार १ फेब्रुवारी २०२४ रोजी भारताचा सहावा अर्थसंकल्प (बजेट) सादर करतील. हा अर्थसंकल्प सादर करत निर्मला सीतारामन मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.

मोरारजी देसाई यांनी एकूण दहा अर्थसंकल्प सादर केले. यातील पाच पूर्ण आणि एक हंगामी असे सहा अर्थसंकल्प त्यांनी सलग सादर केले होते. या विक्रमाची बरोबरी निर्मला सीतारामन करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. आता गुरुवार १ फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. हा हंगामी अर्थसंकल्प मांडत पाच पूर्ण आणि एक हंगामी असे सलग सहा अर्थसंकल्प सादर करण्याची किमया निर्मला सीतारामन करतील.

भारतात पाचपेक्षा जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांमध्ये मोरारजी देसाई पहिल्या स्थानावर आहेत. निर्मला सीतारामन या यादीत १ फेब्रुवारीच्या दुपारी दुसऱ्या स्थानावर पोहोचतील. त्या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांना मागे टाकतील.

भारतात आतापर्यंत फक्त दोन महिलांना देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आहे. यात पहिल्या इंदिरा गांधी आणि दुसऱ्या निर्मला सीतारामन आहेत. डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी ब्रीफकेसची परंपरा मोडून निर्मला सीतारामन यांनी ‘बही खाता’ घेऊन बजेट सादर करण्यास सुरुवात केली.

मोदी सरकारने २०१७ मध्ये आणखी एक परंपरा बदलली. आधी फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जात होता. मोदी सरकारने २०१७ पासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या कामकाजाच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची नवी परंपरा सुरू केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version