मुंबईतील १३ पूल धोकादायक

मुंबईतील १३ पूल धोकादायक

मुंबई, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेने १३ पूल धोकादायक स्थितीत असल्याचे जाहीर केले आहे. गणपतीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणपतीच्या दिवसात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक ठिकठिकाणी ये – जा करतात. या काळात पुलांचा वापर करणाऱ्या मुंबईकरांची संख्या मोठी असते. पण पालिकेने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुलावरून चालताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईतील धोकादायक असलेल्या पुलांची यादी

महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
दादर-टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज
करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज
मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज
फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज
केनडी रेल्वे पूल
फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज
बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रीज
घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version