जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बारावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक झाल्या आहेत. मात्र आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाही.
ही घटना केज शहरातील गट साधन केंद्रातील आहे. आज संध्याकाळी ही आग लागली. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या 1 हजार 199 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या.
शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.