कोथिंबीरच्या जुडीला १२० ते १५० रुपये भाव

कोथिंबीरच्या जुडीला १२० ते १५० रुपये भाव

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोथिंबीर, मेथी, कांदापात अशा पालेभाज्या महागल्याने सर्व सामान्यांच्या खिशाला झळा बसत आहे. नाशिकच्या पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर जुडीला उच्चांकी भाव मिळत असून, दर १२० ते १५० रुपये जुडी असे गगनाला भिडले आहे. मेथीच्या जुडीला देखील ४० ते ५० रुपये भाव मिळत आहे. जून महिन्याचे वीस दिवस उलटूनही अद्याप पाऊस न पडल्याने त्याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. त्यामुळेच उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरात भाव वाढल्याचे चित्र आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version