Bhimashankar Road Accident : भीमाशंकर मार्गावर अपघाताचा थरार! कार आणि दोन रिक्षांची जोरदार धडक; रस्त्यावर एकच गोंधळ

भीमाशंकर मार्गावर कार आणि दोन रिक्षांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 12 जण जखमी झाले असून, जखमींमध्ये लहान मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
Bhimashankar Road Accident : भीमाशंकर मार्गावर अपघाताचा थरार! कार आणि दोन रिक्षांची जोरदार धडक; रस्त्यावर एकच गोंधळ

भीमाशंकर मार्गावर कार आणि दोन रिक्षांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 12 जण जखमी झाले असून, जखमींमध्ये लहान मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मंचरहून भीमाशंकरकडे जाणाऱ्या कारची भीमाशंकरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन रिक्षांना धडक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कार आणि दोन्ही रिक्षांची जोरदार धडक झाल्यानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा- Crime News: 'दृश्यम स्टाईल'मध्ये भावाला संपवलं.. 45 ट्रॉली मातीखाली गाडलेले सत्य बाहेर! भावानेच रचलेला क्रूर कट उघड अन्..

जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातामुळे भीमाशंकर मार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाल्याची माहिती आहे. कारमधील प्रवाशांनी मद्यसेवन केले असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

चालकाचा वाहनावरील ताबा सुटला होता का, वेग अधिक होता का किंवा अन्य काही कारणामुळे हा अपघात झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे अपघाताचे कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. भीमाशंकर मार्गावर कार आणि दोन रिक्षांचा भीषण अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version