महायुतीतर्फे डॉ.सुभाष भामरे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

महायुतीतर्फे डॉ.सुभाष भामरे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

धुळे, २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : धुळे लोकसभा मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, आमदार जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी भाजपा सह घटक पक्ष देखील सहभागी होणार आहेत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version