कुस्तीपटू विजय चौधरीचा सन्मान

कुस्तीपटू विजय चौधरीचा सन्मान

पुणे, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजय चौधरी यांना कुस्तीतील कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. राज्य पोलीस विभागात विविध पदांवर कार्यरत असताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कर्तृत्ववान पोलिसांना राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह हा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅटट्रिक नोंदविणार्‍या विजय चौधरीने महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्ण पदक जिंकले. तसेच २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version