कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार मानुषी छिल्लर

कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार मानुषी छिल्लर

मुंबई,२४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मिस वर्ल्ड आणि बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री मानुषी छिल्लर यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. यंदा मानुषी अनेक कमालीच्या लूक्समध्ये फेस्टिवलला चार चाँद लावणार आहे. या बद्दल मानुषी म्हणाली ” मी एवढं खात्रीशीर सांगू शकते की काहीतरी प्रायोगिक नक्कीच असणार आहोत आणि गेल्या वर्षीच्या ग्लॅमर लुकपेक्षा यावर्षीचे लूक्स पूर्णपणे वेगळे असणार आहेत. या वर्षी मला एंजल लूक्स या थीमवर काम करायचे आहे जे कमालीचं सुंदर आहे “पुढे ती म्हणाली की, ती महोत्सवाच्या 77 व्या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी “उत्साहीत” आहे.
वर्क फ्रंटववर मानुषी शेवटची ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये दिसली होती ज्यामध्ये तिला ‘कॅप्टन मीशा’ म्हणून तिच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली होती. त्यानंतर आता ती ‘तेहरान’ या नव्या चित्रपटात दिसणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version