रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचा उद्घाटन समारंभ संपन्न

रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचा उद्घाटन समारंभ संपन्न

पुणे, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील सेवा भवन येथे रविवारी (२१ एप्रिल २०२४) रोजी रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचा उद्घाटन समारंभ पार पडला. ट्विटर अर्थात एक्स (X ) या समाजमाध्यमावर एकत्र आलेल्या मंडळींनी मिळून या ट्रस्टची स्थापना केली आहे. सेवा भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी भूषवले तर प्रमुख वक्ते हे भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी होते.

या कार्यक्रमात रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद जोशी आणि सचिव प्रसाद ठोसर यांनी ट्रस्टमार्फत आजपर्यंत झालेल्या कामाची आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या उपक्रमांची माहिती सादर केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते परंतू व्यस्त कार्यक्रमांमुळे ते हजर राहू शकले नाही त्यामुळे त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या सदभावना व्यक्त केल्या. अशी माहिती कार्यक्रम आयोजकांनी जय महाराष्ट्र न्यूजला दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version