नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण केंद्र सरकारसाठी मोठी फायद्याची ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २०२३ ते २०२४ दरम्यान देशातील कच्च्या तेलाच्या आयात बिलामध्ये १६ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे केंद्र सरकारचे २५.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच २.०८ लाख कोटी रुपये वाचले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना दिलासा देता आला असता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.