उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे वाहतुकीत बदल

उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे वाहतुकीत बदल

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात विविध राजकीय पक्षांकडून गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून फेरी काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे.विभागीय आयुक्त कार्यालय (कौन्सिल हॉल चैाक) ते ब्ल्यू नाईल हॉटेल रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version