उत्कर्षा रूपवते यांचा वंचितमध्ये प्रवेश

उत्कर्षा रूपवते यांचा वंचितमध्ये प्रवेश

अकोला, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे आदी उपस्थित होते.

कोण आहेत उत्कर्षा रूपवते

उत्कर्षा रूपवते यांना कुटुंबातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. २०११ मध्ये त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. सुरूवातीला त्यांनी युवक काँग्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू केला. सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version