अतुल देशमुख राशपात प्रवेश करणार?

अतुल देशमुख राशपात प्रवेश करणार?

शिरुर , ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नुकतेच भाजपाला रामराम ठोकलेले खेड आळंदी विधानसभेचे भाजपाचे समन्वयक अतुल देशमुख आज राशपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

खेड आळंदी विधानसभेचे भाजपाचे समन्वयक अतुल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाला रामराम ठोकला. भाजपाला रामराम केल्यानंतर आज अतुल देशमुख हे पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच आज ( ११ एप्रिल २०२४) संध्याकाळी पाच वाजता अतुल देशमुख हे पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेतृत्व आहे.त्यामुळे लोकसभेच्या रणधुमाळीत अमोल कोल्हेंनी हा भाजपला मोठा धक्का दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version