पुण्यात तृतीय पंथासाठी आता नवी नियमावली

पुण्यात तृतीय पंथासाठी आता नवी नियमावली

पुणे, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे शहरातील चौकांमध्ये सिग्नलला आणि धार्मिक कार्यक्रमात घरी जाऊन नागरिकांकडे जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येणार आहे.याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त यांनी दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी वाहतूक शाखा,पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि बीट मार्शलकडून करण्यात येणार आहे.

लग्न समारंभ, विविध सण, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, बारसे, नामकरण विधी अशा कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथीयांकडून पैशांची मागणी केली जाते.
निमंत्रण नसताना बऱ्याचदा पैशांसाठी जबरदस्ती केली जाते. शहरातील मुख्य चौकांमध्ये, बाजारपेठांमध्ये तृतीयपंथीयांकडून वाहनचालक आणि नागरिकांना पैशांसाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली आहे.

काय आहेत नियम ?

१) तृतीयपंथीयांना नागरिकांच्या घरी आणि दुकानांमध्ये जाऊन जबरदस्तीने पैसे मागण्यास मनाई राहील.

२) लग्न, बारसे, अंत्यविधी, उत्सव अशा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये निमंत्रणाशिवाय जाता येणार नाही.

३) मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पैशांची मागणी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. भिक्षेकऱ्यांकडून लहान मुलांचा वापर करणे गंभीर गुन्हा आहे.अशा भिक्षेकऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त यांनी दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version