नाशिक, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : एप्रिल महिन्यातच नाशिक जिल्ह्यात पाणीसाठा तीस टक्क्यांवर आल्याने आगामी काळात नाशिक जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे… जिल्ह्यात छोटे-मोठे असे एकूण चोवीस प्रकल्प आहेत.. या सर्व धरणांमध्ये मिळून फक्त तीस टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने एप्रिल महिन्यातच ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.
ऐन निवडणूक काळात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास २२० हुन अधिक टँकरने सध्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ७ तालुक्यात प्रशासनाने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केल्याची परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे. यामध्ये प्रामुख्याने सिन्नर,मालेगाव, नांदगाव, बागलाण, चांदवड,येवला याठिकाणी परिस्थिती बिकट आहे. सात तालुक्यामधील जवळपास दोनशेहून अधिक गावात सध्या प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची देखील भीती सध्या व्यक्त होत आहे.
नाशिकच्या इगतपुरी आणि त्रंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात देखील भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावे लागत आहे… इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात छोटे-मोठे अनेक धरण आहेत..मात्र, या भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे..
जिल्ह्यात एकूण छोटे मोठे असे २४ प्रकल्प आहेत मात्र या प्रकल्पांपैकी जवळपास दहा धरणांमध्ये २५ टक्क्याहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावं लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ४७% पाणीसाठा असले तरी बाष्पीभवन मुळे हा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे एक मोठं आवाहन प्रशासनासमोर असणार आहे.
मागच्या वर्षी अल नीनो या वादळामुळे महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळाले..मात्र आता हेच दुष्काळ अधिक गडद झाल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे..ऐन निवडणुकीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे..त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.