पुणे, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील रस्त्यांवर सुरू असणाऱ्या खोदाईच्या कामांना बंदी घातली आहे. शहरातील सेवावाहिन्यांच्या कामासाठी रस्त्यावर खोदाईची कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पुणे महापालिकेच्या पथ विभागाने विविध विभागांना दिली आहे. त्यानंतर खोदाईच्या कामांना परवानगी मिळणार नाही. ३० एप्रिलनंतर खोदाईची कामे कोणत्याही परिसरात सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेकडून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पुणे महापालिकेने केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.