पुण्यातील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी

पुण्यातील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी

पुणे, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील प्राचीन खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी गणपती आणि तुळजाभवानी मातेची प्राचीन मूर्ती चोरून नेली. हा प्रकार आठ मार्चच्या रात्री घडला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या प्राचीन चांदीच्या मूर्ती चोरून नेल्या. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, गणपती आणि तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचा समावेश आहे. याशिवाय चोरट्यांनी मंदिरातील भिंतीवर असलेले चांदीचे मखर चोरले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version