सावित्रीबाई फुले विद्यापीठात पुन्हा विद्यार्थ्यास मारहाण

सावित्रीबाई फुले विद्यापीठात पुन्हा विद्यार्थ्यास मारहाण

पुणे, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. विद्यापीठाच्या कॅन्टीन परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. होस्टेलच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील पोस्ट डिलीट केल्यावरून शिउबाठा गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी अभाविपने केली. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून या प्रकरणाचा चतुर्श्रुंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version