पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी

पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी

चित्रदुर्ग, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे इस्रोने पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी घेतली. हे विमान अंतराळ यात्रेसाठी वारंवार वापरण्याच्या हेतूने विकसित करण्यात आले आहे. शुक्रवारी २२ मार्च रोजी झालेल्या चाचणीत विमान धावपट्टीवर व्यवस्थित उतरले. चित्रदुर्ग येथील एअरोनॉटिकल टेस्ट रेंजच्या धावपट्टीवर सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी चाचणी घेण्यात आली. चाचणीच्या वेळी विमान स्वयंचलित पद्धतीने धावपट्टीवर व्यवस्थित उतरले.

चाचणीसाठी पुष्पक विमान चिनुक हेलिकॉप्टरने उचलून जमिनीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर नेले. यानंतर हेलिकॉप्टरने विमान सोडून दिले. हेलिकॉप्टरपासून स्वतंत्र होताच पुष्पक विमानाची स्वयंचलित यंत्रणा सुरू झाली. विमान थोड्याच वेळात स्वयंचलित पद्धतीने धावपट्टीवर व्यवस्थित उतरले.

पुष्पक विमान १.७५ टन वजनाचे आहे. आधुनिक स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून विमान आरामात धावपट्टीवर उतरू शकते. इस्रोने शुक्रवारी विमानाच्या स्वयंचलित यंत्रणेची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे इस्रोने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version