पुण्यात माल वाहतूकीसाठीच्या वाहनांवर निर्बंध

पुण्यात माल वाहतूकीसाठीच्या वाहनांवर निर्बंध

पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी :  पुणे शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत वाहनांमध्ये माल चढविण्यास आणि उतरून घेण्यास बंदी राहील. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होते. रस्त्यांवरील पार्किंगच्या जागेचा वापर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये माल चढविण्यास आणि उतरून घेण्यासाठी (लोडिंग-अनलोडिंग) केला जातो. त्यामुळे इतर वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. शिवाय, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेकडून मुख्य रस्त्यांवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version