सांगली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक ६१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे. आवक कमी असल्यामुळे हळदीला सरासरी १८ ते २५ हजारांपर्यंत दर मिळाला आहे. दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.