तलाठ्याला लाच घेताना पोलिसांनी पकडले

तलाठ्याला लाच घेताना पोलिसांनी पकडले

पुणे,१९ मार्च २०२४, प्रतिनिधी : शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले. वडगाव मावळ येथे सोमवारी पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली.

एसीबीचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी हा मावळ तालुक्यातील करुज येथे कार्यरत आहेत. तक्रारदार ४० वर्षीय व्यक्तीच्या शेताच्या गटाची फोड केली. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घ्यायची होती. त्यासाठी तलाठ्याने त्यांच्याकडे ५० हजारांची लाच मागितली. याबाबत संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली. त्याची १५ मार्च रोजी पडताळणी केली. त्यावेळी तलाठी दगडे याने पंचांसमक्ष ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबीच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी तलाठ्याने लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजारांची लाच स्वीकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने तलाठ्याला ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात वडगाव मावळ तालुक्यात गुन्हा दाखल केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version