विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काच

विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काच

पंढरपूर, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम सुरू असताना विठ्ठल मूर्तीचे नुकसान येऊ नये यसाठी खबरदारी घेण्यात येत आहे. विठ्ठल मूर्तीभोवती बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच बसवण्यात आले आहे. या काचेच्या संरक्षण कवचामध्येच विठ्ठलाचे दैनंदिन सर्व नित्योपचार होणार आहेत. दिवसातून ५ तास मुखदर्शन याशिवाय इतरवेळी गर्भगृहाच्या सुधारणांचे काम होत राहणार आहे. या काचेच्या संरक्षण कवचामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहे. मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर विठ्ठलाचे दर्शन २४ तास उपलब्ध आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version