ट्रकने मजुरांना चिरडले, चौघांचा मृत्यू, ८ जखमी

ट्रकने मजुरांना चिरडले, चौघांचा मृत्यू, ८ जखमी

कोल्हापूर, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी – हातकणंगले इथे पुलाजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. सर्व जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काँक्रिट मिक्सर मशीन लावत असताना मजुरांना ट्रकने उडविल्याने हा अपघात झाला.

स्लॅब टाकणाऱ्या कंत्राटदाराच्या मजुरांची टोळी शिये येथून आपले काम आटोपून टेम्पोमधुन भादोलेकडे निघाले होते. वाठार इथे आले असता मिक्सर मशीन सोडवून ते लावण्यासाठी सर्वजण खाली उतरले. त्याचवेळी कोल्हापूरकडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या सर्व मजुरांना उडविले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version