मनोज जरांगेंची २४ मार्चला निर्णायक बैठक

मनोज जरांगेंची २४ मार्चला निर्णायक बैठक

जालना, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : शासनाने मराठा समाजाची दिशाभूल केली. ‘सगेसोयऱ्यां’ बाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला नाही, यासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. आरक्षणासाठी जनता रस्त्यावर असताना आता निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व बाबींवर समाजबांधवांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी २४ मार्चला अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक बोलावली असून या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज उपस्थित राहणार आहे.तरी आता मराठा समाजाची पुढील दिशा काय यावरती ही बैठक संपन्न होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version