पाटणा, दि. १६ मार्च, २०२४ – लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांना अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना छातीत तीव्र वेदना आणि उच्च रक्तदाबाची तक्रार होती. ९ महिन्यांत तेज प्रताप यांची प्रकृती खालावण्याची ही दुसरी वेळ आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. काल तेज प्रताप यांनी बक्सर जिल्ह्याला भेट देऊन कृष्णब्रह्म येथील ज्ञान बिंदू ग्रंथालयाचे उद्घाटन केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.