मुंबई, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत बोरिवली पूर्वेत देवीपाडा परिसरात आज साफसफाई करण्यात आली. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा हस्ते या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अभियानात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन संपूर्ण बोरिवली परिसर स्वच्छ करण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.