गरवारे मैदानावर होणार दिवसरात्र क्रिकेटचे सामने

गरवारे मैदानावर होणार दिवसरात्र क्रिकेटचे सामने

छत्रपती संभाजीनगर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : महापालिकेच्या गरवारे स्टेडियमवर क्रिकेटचे दिवसरात्र सामने खेळवता येणार आहेत. स्टेडियममध्ये फ्लड लाईट लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून संबंधित संस्थेला कामदेखील दिले आहे. या कामावर सुमारे सहा कोटी रुपये खर्च केले जातील अशी माहिती मिळाली आहे. गरवारे स्टेडियमचे रुप पालटण्याचा प्रयत्न पालिकेने प्रशासन करीत आहे. हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला असून या कामासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात पालिकेने या कामासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उर्वरित निधी शासनाच्या माध्यमातून किंवा सीएसआर फंडातून मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गरवारे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकर (एसपीव्ही) तयार करण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने शासनाला पाठवला आहे. शासनाने त्याला परवानगी दिल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version