अजित पवारांचा पुन्हा शरद पवारांना टोला

अजित पवारांचा पुन्हा शरद पवारांना टोला

बारामती, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामतीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी थेट शरद पवारांवर टीका केली. उतार वयातील लोकांनी आशिर्वाद देण्याचं काम करायचं असतं. चुकलं तर कान धरायचा असतो. फारच काही कंटाळा आला तर भजन करायचं असतं,” असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून टोला लगावला. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आपल्या भाषणातून अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून सवाल केला आहे. वरिष्ठांनी आता थांबावं, युवकांच्या हातात नेतृत्व द्याव असं अजित पवार म्हणाले होते, आता पुन्हा एकदा वयावरून भाष्य केल्यानंतर शरद पवार यावर काय उत्तर देतात हे आता पाहायला हवं.

दरम्यान, बारामतीत अजित पवारांनी भर सभेत खासदार सुप्रिया सुळे यांची मिमिक्री करत टीका केली. अनेक जणांना फोन येत आहेत. अनेकांना भावनिक आवाहन केलं जात आहे. १५ वर्ष ज्यांना फोन केला नाही त्यांनाही फोन येतील, तुम्हाला विचारलं जाईल, असे कसा आहेस? काय मदत लागली तर सांग. मला येऊन भेट. पण मग इतक्या वर्ष काय करत होतात असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच संसदेत भाषणे करून काय होत नाही, त्यासाठी निधीही आणावा लागतो असं म्हणत सुप्रिया सुळेंवर अजित पवारांनी हल्लाबोल केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version