मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाची पाटी बदलली

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाची पाटी बदलली

मुंबई, १३ मार्च २०२४ , प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेरील पाटी बदलण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ अशा नावाची पाटी लावण्यात आली आहे. शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हा बदल केला आहे.

राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असं ठरवलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version