संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही

संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही

प्रतिनिधी, संभाजीनगर, दि. १३ मार्च २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा उमेदवार कोण हे अद्यापही ठरलेले नाही, त्यामुळे ही जागा भाजपा लढवणार की शिवसेना लढवणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र आता शिंदे गटाकडून या जागेवरती दावा करण्यात येत आहे. तर, छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी मंत्री भुमरे यांना द्यावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाला मिळणार असल्याची चर्चा होत असतानाच भुमरेंना लोकसभा तिकीट मिळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version