एंट्री मागच्या ओढनीचं रहस्य

एंट्री मागच्या ओढनीचं रहस्य

मुंबई , १२ मार्च २०२४, प्रतिनिधी: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे आताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले असून या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतायत . या प्री वेडिंग फंक्शनसाठी फक्त देशच नाही तर विदेशातील पाहुण्यांनी हजरी लावली होती. या रॉयल प्री वेडिंगची चर्चा आणि सामान्य माणसांपेक्षा जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या माणसाच्या घरी कसं लग्नकार्य होतं याची उत्सुकता संपूर्ण जगाला होती.

या प्री वेडिंग फंक्शनमध्ये अंबानींची होणारी सून अर्थात राधिका मर्चंट हिने एकदम राॅयल लूकमध्ये एंट्री मारली. राधिका मर्चंट हिच्या लूकची जोरदार चर्चा रंगताना दिसली तिचा ग्लॅमरस अंदाज हा जोरदार व्हायरल होऊ लागला.

दरम्यान राधिका मर्चंट ने परिधान केलेला हेवी पीच कलरच्या लेहेंग्यात एंट्री मारताना दिसते . या लूकमध्ये राधिका हिने एक ओढणी घेतली होती, आणि आपला चेहरा त्या ओढणीने झाकला होता. त्या ओढणी मागचं रहस्य म्हणजे ती ओढनी सोन्याच्या धाग्यांनी तयार केलेली असून या ओढणीची खरेदी किंमत कोट्यवधी रूपये असल्याचे देखील सांगितले जातंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version