बुलढाण्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

बुलढाण्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

बुलढाणा, ८ मार्च, २०२४, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रक समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. खानदेश विदर्भ सीमेवर मलकापूर तालुक्यात तालसवाडा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू असून विदर्भ खानदेश महामार्गावर गेल्या दोन तासापासून वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version