टीईटी परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने होणार

टीईटी परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने होणार

पुणे , ६ मार्च २०२४ , प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे यंदा प्रथमच टीईटी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.मात्र,माध्यम निहाय परीक्षा घेताना अडचणी येत असल्याने परिषदेने अखेर ऑफलाईन परीक्षेचा पर्याय स्वीकारला.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या या निर्णयाला राज्य शासनाने मान्यता दिली असून येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ऑफलाईन पध्दतीने टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे.त्यामुळे टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षा असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पध्दतीने तयारी करावी लागणार आहे.तसेच यापूर्वीच्या परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेकडून अत्यंत काळजीपूर्वक परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version