इगतपुरी, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचे लोकार्पण सोमवार ४ मार्च २०२४ रोजी होणार आहे. हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर नागपूर येथून वाहनाने समृद्धी महामार्गावरून थेट इगतपुरीपर्यंत पोहोचता येईल.
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. या मार्गातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला. महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला असून, आता सुमारे ६०० किमी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. एमएसआरडीसीकडून भरवीर ते इगतपुरीदरम्यानच्या २३ किलोमीटरच्या मार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण सोमवार ४ मार्च रोजी होणार आहे.
इगतपुरी ते आमणे या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ९० टक्के कामं झाली आहेत. एका उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण जुलै २०२४ मध्ये होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.