पुणेकरांनो, संकट टळलं !

पुणेकरांनो, संकट टळलं !

प्रतिनिधी, पुणे, दि. २५ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार होतं, त्यामुळे पुणेकर चिंतेत होते. २४ फेब्रुवारी रोजी कालवा समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत धरण साखळीतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला होता. या बैठकीत पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त नियोजन करण्यासाठी चर्चा झाली. पुणे शहरात सध्या तरी कुठलीही पाणी कपात नाही होणार नाही, असा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु पाणी जपून वापरण्याचं आवाहन पुणेकरांना केलं जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version