मेट्रो ३ मार्गिकेला विलंब, प्रशासनाची कबुली

मेट्रो ३ मार्गिकेला विलंब, प्रशासनाची कबुली

प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२४ : मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेला विलंब झाला आहे, अशी कबुली ही मार्गिका उभी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दिली आहे. मार्गिकेला नव्या कालमर्यादेनुसार आता अधिकाधिक सव्वा महिन्यांचाच कालावधी शिल्लक असताना अद्याप चाचणी न झाल्याने विलंब झाला आहे.

मेट्रो ३ ही जवळपास ३३ किमी लांबीची भूमिगत मार्गिका आहे. एकूण २७ स्थानकांच्या या मार्गिकेचा दहा स्थानकांचा पहिला टप्पा आधी डिसेंबर व आता एप्रिलमध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र या मार्गिकेच्या अंतिम चाचणीलाच अद्याप सुरुवात झालेली नसून रूळ जोडणी नसणे, हे त्याचे कारण ठरले आहे. चाचण्यांसाठी आवश्यक असलेले विद्युतीकरणाचे काम, स्थापत्य कामे व रुळ बसविण्याच्या कामाला विलंब झाला असल्याने आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याच्या संचालनास विलंब झाला असल्याचे कंपनीने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version