रेडिओचा आवाज अमीन सयानींचे निधन

रेडिओचा आवाज अमीन सयानींचे निधन

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रेडिओचा आवाज म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय रेडिओ सादरकर्ते अमीन सयानी यांचे निधन झाले. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानींचे पुत्र रजिल सयानी यांनी अमीन सयानींच्या निधनाची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला म्हणून अमीन सयानी यांना एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमीन सयानींवर गुरुवार २२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. दीर्घ काळ ‘ऑल इंडिया रेडिओ’साठी काम केलेल्या अमीन सयानी यांनी रेडिओसाठी अनेक हिंदी आणि इंग्रजी लोकप्रिय कार्यक्रम केले. त्यांनी ५० हजारपेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या रेडिओ कार्यक्रमांना व्हॉईसओव्हर दिला. अनेक रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती केली. तसेच १९ हजारपेक्षा जास्त जिंगल्ससाठी आवाज दिला. रेडिओतील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना २००६ चा लिव्हिंग लीजेंड पुरस्कार, १९९१ चे इंडियन सोसायटी ऑफ अॅडर्व्हटाइजमेंटचे सुवर्णपदक, १९९२ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद आणि लिम्का बुकचा पर्सन ऑफ द इअर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version