‘मुंबईकरांनो धन्यवाद नको, आशीर्वाद हवा’

‘मुंबईकरांनो धन्यवाद नको, आशीर्वाद हवा’

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईत आम्ही व्यवसाय करायला आलो नाही… मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही… ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्यांची ही मुंबई आहे…. काहींनी गेली पंचवीस वर्षे मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले…. मात्र गेल्या दहा वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले…. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही…. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे लागेल ते आम्ही करू…. मला धन्यवाद नको तुमचा आशीर्वाद हवा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळाचौकी येथे शहीद भगतसिंग मैदानावर आयोजित केलेल्या ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमात मुंबईकरांना केले. मुंबईच्या अभ्युदय नगरमधील तीस हजार सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच सोडवण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक सहभागी झाले होते. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि आमदार प्रविण दरेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमात आशिष शेलार, प्रविण दरेकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही भाषणे झाली. आशिष शेलार यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने मुंबईच्या विकासासाठी केलेल्या प्रमुख कामांचा थोडक्यात आढावा घेतला. तर दरेकरांनी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात भाजपाने केलेल्या कामाचा आढावा घेतला. गिरणगाव हा कुणाचा तरी बालेकिल्ला होता. येणाऱ्या काळात हा परिसर भाजपाचा बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही, असे दरेकर म्हणाले.

मुंबईकरांना नऊ मेट्रो दिल्या – शेलार

मुंबईसाठी २०१४ पासून फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतले. वेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना ९ मेट्रो भेट दिल्या आहेत. मुंबईकराला पक्क घर जे मिळतेय ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या चाळीची व्याख्या बदलली. हेरिटेज टीडीआर मुंबईत कधीच नव्हता. तो आणण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. गेल्या दीड वर्षात ८५ हजार गिरणी कामगारांच्या घरांची पात्रता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिली; असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version