पुणे, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची राज्य शासनाने पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना बाहेर काढल्याची चर्चा आहे. पण म्हाडाचा अध्यक्ष झालो तरी महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. सामान्यांना घर मिळावे, त्यांची प्रगती व्हावी हे स्वप्न पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी बघितले आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण यासाठी म्हाडा सारख्या महत्त्वाच्या संस्थेची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.