लावणी कलाकार दिशाची आत्महत्या

लावणी कलाकार दिशाची आत्महत्या

भंडारा, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ठसकेबाज लावणीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिशा ठवरेने ३२ व्या वर्षी भंडारा येथील घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेने झाडीपट्टी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. दिशाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट अर्थात आत्महत्येचे कारण सांगण्यासाठी लिहून ठेवलेले पत्र वा चिठ्ठी असे काही आढळले नाही.

मूळची भंडारा येथील गांधी प्रभागातील दिशा ठवरे दहा वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीत लावणी कलावंत म्हणून परिचित होती. दिशा पती, मुलगा, मुलगी यांच्यासोबत देसाईगंजच्या हेटी येथे वास्तव्यास होती. ‘बाई मी लाडाची गं लाडाची..’ या लावणीवरील तिचे ठुमकेदार नृत्य प्रसिद्ध होते. रसिकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या दिशाने गडचिरोलीसह भंडारा, साकोली व अर्जुनी या परिसरात झाडीपट्टी रंगभूमीवर अदाकारी करून रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. पती आणि मुलांसह भंडारा जिल्ह्यातील मूळ गावी गेलेल्या दिशाने तिथल्या घरी आत्महत्या केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version