चिपळूणमध्ये राडा, राणे – शिउबाठा आमनेसामने

चिपळूणमध्ये राडा, राणे – शिउबाठा आमनेसामने

चिपळूण, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भाजपा नेते निलेश राणे गुहागर येथील सभेसाठी चिपळूणमार्गे जात होते त्यावेळी चिपळूणच्या रस्त्यावर राडा झाला. निलेश राणेंचे कार्यकर्ते आणि शिउबाठाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर चिपळूणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मुंबई – गोवा महामार्ग परिसर तसेच चिपळूण शहरात पोलिसांचा बंदोबस्त आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version