…म्हणून मुंबईत गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार

…म्हणून मुंबईत गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. वर्षभरातील पंधरा दिवस सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास प्रशासन परवानगी देते. यापैकी तेरा दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. मागच्या वर्षी गणेशोत्सवात तीनच दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. यंदा गणेशोत्सवात चार दिवस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील चार दिवस, नवरात्रातील दोन दिवस, दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस, २४ डिसेंबर (नाताळच्या आधीचा दिवस), वर्ष अखेर अर्थात ३१ डिसेंबर आणि ‘ईद-ए-मिलाद’चा दिवस या तेरा दिवशी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. इतर दोन दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version