पंढरपूर, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : वसंत पंचमी निमित्त पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर फुलांनी एका राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आले. यासाठी ५ टन फुलांचा वापर करण्यात आला. लग्न घराप्रमाणे मंदिरात सकाळपासूनच लगबग होती. रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.